💥राजपुत भामटा जात वैधता प्रमाणपत्र विनाअट मिळावे - क्षत्रिय हिंदु सेना


💥राजपुत भामटा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणी💥

सध्या राज्यभरात राजपुत समाजाला राजपुत भामटा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी कसरत करुन सुद्धा व शासनाच्या जाचक अटी असल्याकारणाने राजपुत भामटा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत अाहेत या अनेक अडचणीमुळे राजपुत समाजातील तरुण पिढीला शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे.
तरी, या राजपुत समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या समस्या सोडवण्यासाठी आज दि. ३१ जुलै २०१९ रोजी क्षत्रिय हिंदु सेनेचे संस्थापक विलासरावजी कच्छवे यांनी समाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक मा. ना. अविनाशजी महातेकर यांना क्षत्रिय हिंदु सेने तर्फे राजपुत भामटा जातीचे वैधता प्रमाणपत्र विनाअट मिळावे यासाठी निवेदन दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या