💥पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बेबाकी प्रमाणपत्र देवू नयेत.....!



🔹काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ते गोविंद यादव यांचे आवाहन 🔹


गंगाखेड :
एक लाखापर्यंतच्या पीक कर्ज मंजुरीसाठी बॅंका ईतर बॅंकांच्या बेबाकी प्रमाणपत्रांची सक्ती करत आहेत. परंतू अशा कर्जासाठी बेबाकी प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे बॅंक अधिकाऱ्यांनीही मान्य केले असून यापुढे बेबाकी प्रमाणपत्र देवू नयेत, असे आवाहन कॉंग्रेस तालुकाध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ते गोविंद यादव यांनी केले आहे. बेबाकी प्रमाणपत्राची मागणी केली जात असल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यादव यांनी केले आहे.

सध्या पेरणीचा मोसम सुरू आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थीक अडचणीत असल्याने पीक कर्जासाठी बॅंकांकडे चकरा मारत आहेत. दत्तक बॅंकांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत शासनाकडून निर्देशीत करण्यात आले आहे. १ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जासाठी ईतर बॅंकांची बेबाकी प्रमाणपत्रे मागू नयेत, बाकी असली तरी कर्ज देताना आडकाठी आणू नये, नवीन शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जे देण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बेबाकी सारखी अनेक कागदपत्रे ज्यात फेरफार नकला, मोजणी नकाशा, हैसीयत दाखला आदि अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध कार्यालयांत चकरा मारण्याबरोबरच आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

या संदर्भात कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी स्टेट बॅंक ऑफ ईंडीयाच्या संबंधीत अधितकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. या अधिकाऱ्यांना संदर्भीय परिपत्रके दाखवत शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याबाबत विनंती केली. ईंडीया ( जूनी हैद्राबाद ) बॅंकेचे गंगाखेड शाखा व्यवस्थापक जयराम यांनी सध्या बॅंकेचे ऑडिट सुरू असल्याचे सांगत हे संपताच आगामी आठवड्यात नियमित पणे कर्ज वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे सांगीतले. तर क्षेत्रीय अधिकारी राहुल यांनी सर्वच बॅंकांच्या बेबाकी प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याची बाब मान्य करत फक्त सोसायटी आणि दत्तक बॅंकेचेच बेबाकी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगीतले. तर स्टेट बॅंक ऑफ ईंडीयाचे शाखा व्यवस्थापक सातपुते यांनी यापुढे बेबाकी प्रमाणपत्रांऐवजी शेतकऱ्यांचे स्वयं घोषणापत्र स्वीकारले जाणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आता बेबाकी प्रमाणपत्रासाठी धावपळ न करता स्वयं घोषणापत्र सादर करावे, असे आवाहन गोविंद यादव यांनी केले आहे. कनिष्ठ अधिकारी अशी ईतर प्रमाणपत्रे मागत असतील तर शेतकऱ्यांनी 942154 1111 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे श्री यादव यांच्या वतीने कळवण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या