💥परिवहन विभागाने बजाजच्या क्यूट कारला रिक्षा म्हणून मान्यता दिली आहे💥
✍ मोहन चौकेकर
मुंबई : मुंबई, ठाणे परिसरात आता तीन चाकी ऐवजी चार चाकी रिक्षा धावताना दिसल्यास आश्चर्य मानून घेऊ नका. परिवहन विभागाने बजाजच्या क्यूट कारला रिक्षा म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता रिक्षाचे रुपडे बदलणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित प्रवास करता येणार आहे.बजाजने आपले 'क्वाड्री सायकल' असलेल्या 'क्यूट कार' लाँच केली आहे. या क्यूट कारला सार्वजनिक वाहन सेवा म्हणून नोंदणी करण्यासाठी बजाज ऑटोने परिवहन विभागाकडे अर्ज केला होता. परिवहन विभागाने अर्जाला मान्यता दिली आहे. बजाजची क्यूट कार ही पेट्रोल, सी.एन.जी. आणि एल.पी.जी. या तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या वाहनाची आसन क्षमता, प्रति किमीसाठी होणारा इंधनाचा वापर, इंजिन क्षमता ही ऑटोरिक्षाच्या समकक्ष असल्याची बाब परिवहन विभागाने लक्षात घेतली. त्याशिवाय, सध्या असणाऱ्या तीन चाकी, तीन आसनी रिक्षांना दरवाजे नसून त्याचे टप देखील टणक नसते. त्या तुलनेने या क्युट कारला बंद दरवाजे, टणक टप असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षितेला अधिक वाव असल्याचे परिवहन विभागाने म्हटले.सध्या तीन चाकी ऑटोरिक्षांना असणारे प्रवास भाडे व इतर अटी, शर्ती या नव्या क्यूट रिक्षांना लागू होणार असल्याचे ही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या असणाऱ्या तीन चाकी रिक्षा या मुख्यत्वे बजाज ऑटो कंपनीच्या आहेत. आता बजाजची क्यूट कारही रिक्षा म्हणून धावणार आहेत..
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या